राहिले रे दूर घर माझे...

दूर अमेरिकेतली छोटी छोटी टुमदार अप -टाऊन्स . त्यात निसर्गाच्या सानिध्यातवसलेले रुबाबदार इमले ... पुढे मागे नीटसजवलेले गवताचे ' हिरवे हिरवे गारगलिचे , हरित तृणांच्या मखमालीचे ...'अशी लॉन्स आणि त्यावर ऊबदार उन्हाचीमजा स्वच्छंदपणे लुटणाऱ्या फुलराण्या !पण त्यांचा वर्ण गोरा नाही . या तर गव्हाळवर्णाच्या भारतीय बनावटीच्या फुलराण्या !अमेरिकेच्या गोऱ्या जंगलात ही गव्हाळ फुलेवेगळी आणि टवटवीत दिसतात .

पूर्वेकडीलबोस्टनपासून निघालात की , न्यूयॉर्क , न्यूजर्सी , फिलाडेल्फिया , शिकागो , ह्युस्टन , डॅलसअसा पश्चिमेकडील प्रवास करीत थेट कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलीस आणि सॅन फ्रँसिस्कोपर्यंतपोहोचलात तरी आशियाई , विशेषतः भारतीय वंशाची कुटुंबे दिसतच राहतात . त्यातहीविशेष उठून दिसतात ती मराठी आडनावे . गोखले , नेने , जोशी , दामले , कर्णिक , प्रधान ,यांच्याबरोबरच भोसले , चव्हाण , पवार अशा खास - हाटी नावांच्या पाटया असलेले बंगलेपाहून मनोमन धन्य व्हायला होते . पश्चिमेला सॅन होजे सारख्या कम्प्युटरच्या नगरीत तरसंध्याकाळी रस्त्याने चाललात , तर कडेला नवदाम्पत्य मराठीत गुजगोष्टी करताना दिसेल आणिकोणाच्या मोटारीच्या खिडकीची काच खाली आली , तर चक्क लता मंगेशकर , आशा भोसले ,नाही तर सुधीर फडकेंच्या भावागीताची सीडी ऐकायला येईल . अमेरिकेतले मराठीपण असेरसरसलेले आहे .
१९६५च्या
सुमारास लिन्डन जॉन्सन यांची अध्यक्षीय कारकीर्द चालू असताना भारतीय ,विशेषतः मुंबई - पुण्याचे डॉक्टर्स अमेरिकेत जाऊ लागले . त्यापूर्वी इथल्या उच्चशिक्षितांनीआणि महत्त्वाकांक्षी तरुणांनी युरोपात इंग्लंडला जाण्याची रुढी होती . ती मोडली गेली आणिमराठी तरुण डॉक्टर्स अमेरिकेकडे जायला लागले . ते तिथे गेले , स्थायिक झाले आणि त्यांनीस्वतःबरोबरच भारताचे नाव मोठे केले . भारतीय खूप मेहनती आणि हुषार अशी ख्याती झालीआणि भारतीयांना मागणी वाढली . मग इंजिनियर्स जायला लागले . नव्द्वचे दशक मध्यावरआले आणि ' वायटूके ' ची भीती जन्माला आली . बघता बघता मुंबई , पुण्याबरोबरच नाशिक, औरंगाबाद , कोल्हापूर , नागपूर वगैरे शहरांतील इलेक्ट्रॉनिक आणि आयटी इंजिनियर्सनीपश्चिम अमेरिकेचा रस्ता धरला . कारण एव्हाना महाराष्ट्रात इंजिनियरिंग कॉलेजांचे जाळेपसरले होते आणि मध्यमवगींय मराठी कुटुंबातील मुले इंजिनियर्स होऊ लागली होती .
२१
वे शतक उजाडेपर्यंत अमेरिकेत सर्रास मराठी कुटुंबे दिसू लागली . कारण ' वायटुके ' साठीअमेरिकेत गेलेले तरुण आता तिथेच स्थिरावून त्यांचे विवाहसुध्दा होऊ लागले होते . तोवरपहिल्या पिढीतील अमेरिकेतील मराठी स्थलांतरीतांची मोठाली घरे झाली होती . बृहनमहाराष्ट्रमंडळासारख्या संस्थांनी एव्हाना मूळ धरले होते आणि जवळपास प्रत्येक शहरात महाराष्ट्रमंडळाची स्थापनाही झाली होती .
यातून
महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर ' नवा महाराष्ट्र ' जन्माला आला . इथे मराठीचे सरकारनव्हते , या महाराष्ट्रासाठी कोणी आंदोलनही छेडले नव्हते . तिथे सीमाप्रश्न नव्हता आणिप्रांताप्रांतातले वादही नव्हते . ' मराठी बचाव ' आंदोलन नव्हते आणि पुढाऱ्यांची जातवारविभागणी आणि साठमारीही नव्हती . कारण इथला अनभिषिक्त ' नवा महाराष्ट्र ' कोणत्याहीसत्तेसाठी नव्हे , तर घराच्या अतूट ओढीतून निर्माण झाला होता . ' त्या तिथे , पलिकडे ,तिकडे ; माझीया प्रियेचे झोपडे ...' हे गीत गाताना कवीच्या मनात ज्या भावनांचे तरंग उठले ,तीच भावना अमेरिकेत असणाऱ्या हजारो मराठी भाषकांच्या मनात जागी होती . त्यातूनच हासीमापार महाराष्ट्र उभा राहिला .
ही
मंडळी सतत काही ना काही निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करतात . कधी भारताचास्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या शानदार संचलनात महाराष्ट्राचा फ्लोट ( चित्ररथ )निघतो , त्यावर ही मंडळी पुणेरी पगडया , कोल्हापुरी फेटे , पैठणी साडया , इरकली लुगडीआणि कोकणी खोपे घालून मिरवतात , तर कधी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या द्विवार्षिक संमेलनाच्यानिमित्ताने पाच - सहा तासांचा विमान प्रवास करून एखाद्या शहरात जमतात ' लाँग विकेंड 'साजरा करतात . कधी बे एरिया महाराष्ट्र मंडळाचा रौप्य महोत्सव म्हणून खास मराठी साहित्यसंमेलन घडवून आणतात , तर कधी कोणाच्या घरची मुंज किंवा गणेशोत्सव म्हणून एकत्रजमतात आणि महाराष्ट्राच्या आठवणींना उजाळा देतात .
अमेरिकेत
स्थायिक झालेली ही मराठी मंडळी रुढ अर्थाने ' यशस्वी ' आहेत . त्यांना इथल्यासमाजात मानाचे स्थान आहे . त्यातील अनेक डॉक्टरांची स्वतःची रुग्णालये , तर आर्थिकतज्ज्ञांच्या स्वतःच्या मोठया फर्मस् आहेत . बँकांमध्ये , फार्मास्युटिकल आयटी कंपन्यांत त्यांनामोठया हुद्याच्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आहेत . इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे आणित्यांच्या मुलांची मातृभूमीच अमेरिका आहे . तरीही ...
तरीही
त्यांची नाळ मात्र मराठी मातीतच रुजलेली आहे . म्हणूनच मीना नेरुरकरांसारखीप्रथितयश डॉक्टर आपला व्यवसाय सांभाळून इथल्या लोककलांचे भान विसरत नाही आणि 'सुंदरा ..' चा कार्यक्रम बसवते आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना स्तिमित करते , तर श्रीठाणेकरांसारखा यशस्वी उद्योजक ' ही श्रींची इच्छा ' या पुस्तकाची निर्मिती करुन महाराष्ट्रातीलमराठी मुलांना स्फूर्ती तर देतोच , पण साहित्य निर्मितीचे मूल्यही वाढवतो . न्यूजर्सीपासून लॉसएंजिलिसपर्यंत अनेक शहरांत शास्त्रोक्त संगीत , नृत्य यांचे विधिवत क्लासेस चालवणाऱ्यामहिला हमखास मराठी भाषकच असतात . हा केवळ योगायोग नाही .
अमेरिकेत
कोणाच्या घरी पाहुणा म्हणून गेलात की , एक दृश्य हमखास अनुभवायला मिळते .महाराष्ट्रातून आलेला पाहुणा म्हणून शहरातल्या महाराष्ट्र मंडळात द्वाही फिरवली जाते .शुक्रवार वा शनिवारची रात्र मुक्रर होते आणि एखाद्या प्रशस्त घरात मैफल जमते . डझनभरकुटुंबे एकत्र येतात . मग गप्पांचे फड रंगतात . ' आम्ही भारतात होतो , तेव्हा काय स्थितीहोती आणि आता काय आहे ', याचे चर्वण सुरू होते . मुद्दे तेच ते आणि आठवणीही त्याच त्या ,पण त्या स्मरणरंजनात गोडवा असतो , तशीच एक काही तरी हरवल्याची गडद झालेही असते . ' राहिले रे दूर घर माझे ' ही जाणीव या मंडळींना अस्वस्थ करत असल्याचे जाणवत राहते .त्यातूनच आठवणींना वेगवेगळे फाटे फुटत राहतात . पु . . देशपांडे , लता मंगेशकर ,भीमसेन जोशी , बापू नाडकर्णी , यशवंतराव चव्हाण , विठ्ठलराव गाडगीळ , जयंत नारळीकरअशा नवांना उजाळा मिळत राहतो . पुलंनंतरही महाराष्ट्रात साहित्यिक झाले नावाजलेसुध्दा ,बापूंनंतर सुनील गावस्कर , सचिन तेंडुलकर असे खेळाडू झाले , हे आपल्याला कळत असते ,पण अमेरिकेत आलेल्या मंडळींना त्यांचे कौतुक असेलच असे नाही . ते भारतातून पहिल्यांदाअमेरिकेला यायला निघाले , तेव्हा त्यांनी मनाच्या पटलावर महाराष्ट्राचा एक फोटो क्लिककेलेला असतो . त्या फोटोत असलेला महाराष्ट्रच त्यांच्या मनावर कोरलेला असतो त्यांचेमहाराष्ट्राचे घडयाळही तेव्हाच थिजलेले असते . त्यामुळेच कोणासाठी आजही यशवंतरावचव्हाणच मुख्यमंत्री , तर कोणासाठी ते घडयाळ शरद पवारांपर्यंत पुढे सरकलेले . कुणालाकिशोरी अमोणकरांच्या पलीकडचे ठाऊक नाही , तर कोणाला बकुळ पंडितांपर्यंतची नावे माहितआहेत . अशा गप्पांमध्ये आपण फक्त श्रवणभक्ती करायची , कारण महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्रपवनाकाठच्या धोंडीच्या निष्ठेने सांभाळणाऱ्या या शिलेदारांसाठी त्यांच्या मनातला महाराष्ट्रचमहत्त्वाचा असतो , तो तसाच राहू देणेही गरजेचे असते .
बृहन्महाराष्ट्र
मंडळाच्या संमेलनाच्या निमित्ताने आता हे अमेरिकन मराठमोळे तीन दिवस एकत्रयेतील . फिलाडेल्फियात महाराष्ट आकार घेईल . मराठी पदार्थ , साडया , धोतरजोडया ,करकरा वाजणाऱ्या वहाणा , अभंग , लावण्या , नाटयपदे , मराठी नाटक हे सारे करतानाएकमेकांच्या गळाभेटी होतील . आठवणींचे मळे फुलतील , त्यात झुळझुळ वाहणाऱ्या पाटाच्यापाण्यासारख्या गप्पा होतील . त्यात यथेच्छ डुंबून ही मंडळी आपापल्या गावाला परततील ,आपल्या कामात व्यग्र होतील ; पण पुन्हा दोन वर्षांनी भेटायचे , हे आश्वासन त्यांच्या मनालातजेला देईल .
त्याच
शिदोरीवर ते आनंदात दिवस काढतील आणि आपापला महाराष्ट्र आपापल्या मनात नीटजतन करून ठेवतील . तोच तर त्यांचा लाखमोलाचा आणि जन्मभराचा ठेवा आहे .

by Maharashtra times

Comments

Popular posts from this blog

बोलीभाषा......

Painful Echoes..

Interesting Numerology!!