बोलीभाषा......

"काय बेटी ती कंजुषी तुमच्या पुण्या-मुंबईत घ्या चहा घ्या " असं कोण्या नागपूरकरान कोण्या पुण्या किंव्हा मुंबई च्या आपल्या पाव्हण्याला चहा देताना म्हटलं तर?
"मला नागपुरात जायचंय ह्या दिवाळीत तुला यायचं तर ये नाहीतर राहा इतेच नोकरीकरत आयुष्यभर" असं कोण्या नागपूरकर नोकरदार नवऱ्यानं आपल्या मुंबईत वाढलेल्या नोकरदार बायकोला त्या दोघांच्या कर्मभूमी पुण्यात म्हंटलं तर?
काय हे सांगायलाच हवा का किती बा चा बा ची होईल ते? एक गोष्ट लक्ष्यात घेण्याजोगी आहे इथे ती म्हणजे वरचे दोन्ही हि प्रसांगत संभाषण करणारे रक्ताचे नातेवाईक आहेत. मग विचार असा येतो कि एकाच वाक्य दुसऱ्याच्या मनाला इतकं खोलवर का लागावं ?
मला असा वाटतं,
बोली भाषा आणि त्या भाषेचा विचार प्रचार आणि मनावर पडलेला प्रभाव, वापरलेले शब्द, आणि त्या शब्दांचा आपल्या मेंदूला माहिती असलेला अर्थ लावण्याच्या वृत्ती मुळेच घडलेले मनावरचे आघात, त्यामुळे वर सांगितल्या प्रमाणे झालेली बा चा बा ची, आणि एकंदरीतच हाताबाहेर गेलेली स्थिती. भाषा मराठीचं पण बोलीभाषा वैदर्भिय त्या मधले अंतर आणी ती न समजल्या मुळे झालेले गैरसमज, गोंधळ.
विदर्भ, ह्या संकल्पनेत येण्याआधी पहिले पुणे-मुंबई-पुणे बोलीभाषा पाहुयात ! हो मी मराठी चित्रपटाबद्दलच बोलतोय. स्वप्नील पुणेकर आणी मुक्ता मुंबईकर आपापल्या बोलीभाषत कसे संपूर्ण चित्रपटभर आपली करमणूक करतात ते आपण सगळ्यांनी पहिलंच असेल. मी तर चांगलं १०- १५ वेळा बघितला आहे.
प्रत्येक बोलीभाषा त्या परिसरातील राजकीय, सामाजिक , आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबुन असते. जसं बघा आपलया देशात असा म्हणतात कि प्रत्येक ५० किमी वर खाण्याच्या चवी बदलतात. आपला भारत देश म्हणजे पूर्वीचे काही शे संस्थानं मिळून बनलेला देश आहे.
संपूर्ण देशाचा विचार न करता फक्त महाराष्ट्रभर विचार जरी केला तरी असं कळेल कि जरी हा प्रदेश मराठी भाषिकांचा म्हणून होता तरी त्याला " संयुक्त महाराष्ट्र " असंच नांव ठेवलं आहे अगदि महाराष्ट्राच्या जन्मापासूनच !!
मला असं वाटतं हे नाव मराठी भाषिकांच्या वेगवेगळ्या बोलीभाषेमुळे तर ठेवल्या गेलं नसावं ना? महाराष्ट्राची लोकसंख्या हि जवळपास मेक्सिकोच्या लोकसंख्ये इतकीच.. म्हणजे असं बघा मुंबई आणी नागपूरचा विचार केला तर हि भूभागं मॅक्सिकोची दोन टोक होतील. एका देशाचा भूभाग, राजकीय परिस्थिती, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती हि दोन टोकांना निश्चितच सारखी नसते, फक्त भाषेचेच काय ते साम्य असते नाही का? मला अश्याच समभाषीय राष्ट्रात (अमेरिकेत) दोन वेगळ्या (मध्य आणि पश्चिम ) भागात काही वर्षे काम करण्याची संधी मिळाली, ह्या दोन्ही भागातले माझे अनुभव असे कि जरी लोक इकडे इंग्रजी बोलतात तरी बोली भाषेत फार फार मोठा फरक आहे. असं म्हणा कि (मध्य अमेरिका आणि पश्चिम अमेरिकेतल्या ) दोन नागरिकांना एकमेकांची भाषा (आपण याला बोलीभाषा म्हणू कारण भाषा तर इंग्रजीच ना ) समजायला कठीण जाते. कळतही नाही बरेचदा ! हा जर इतर समभाषीय देशांचा प्रश्न असेल जे कि फक्त काही शे वर्षीन पूर्वी जन्मायला आहे, तर मग विचार करा भारताचं काय? भारत खूप मोठा विषय आहे आपण संयुक्त महाराष्ट्र्राबद्दल बघूया तेच एक मोठ्ठ प्रकरण आहे.
महाराष्ट्राचेच बघयला गेलात तर तसे ५ भाग विदर्भ , मराठवाडा , खान्देश , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. हे पाच प्रभाग मागच्या काही शे वर्षीन पासुन संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या शिवाय इतिहासात कोणीच एकवेळेला एकत्र नंदवले नाहीत. मराठ्यांच्या राज्यानंतर ह्या भागाची भाषा मराठी जरी राहिली तरी त्या भाषेवर त्या त्या प्रभागाच्या चालीरीती आणि वर लिहिल्या प्रमाणे इतर गोष्टीचा प्रभाव हळू हळू पडू लागला आणि ते अगदी साहजिकच आहे. जस बघा मुंबईत साहेब असल्याने तसं मुंबई मराठी नीटनेटकं इंग्रजी भाषेचे शब्द मिसळेल तोलामोलाच झालं. पुण्याचं ते राजेशाही.. ती मराठी साम्राज्याची राजधानीच शेवटी त्यामुळे भाषा शुद्ध त्याचबरोबर दोन्हीही भूभागात पाऊस भरपूर त्यामुळे समृद्धी, गारवा त्या मुळे लोकांची डोकी थंड, शांत आणि म्हणून भाषा सुंदर, गोडवा, आतून ओलावा, मधाळ अलंकारिक. पण विदर्भ म्हणाल तर मुळात मराठा साम्राज्यात फार काळ राहिला नाही नंतर साहेबानी आताच्या मध्यप्रदेशात विलीन केलं त्यामुळं सतत परकेपणाची जाणीव असलेला, उपेक्षित राहिलेला प्रदेश. अगदी त्या भागाला खुश ठेवायला म्हणून महाराष्ट्राचं उपराजधानी पद मिळालं खरं पण राजकीय नेते त्याला बिग व्हिलेजचं म्हणायचेत अशी हि "चांगली" राजकीय परिस्थिती, भौगोलिक म्हणाल तर ना कोणतं पर्यटन स्थळ, ना नदी, ना समुद्र, ना कोणत्या पर्वतरांगा,ना कुठलं जवळपास मोठ शहर, जर काही असलच तर काळी माती पण ती सुद्धा पावसाअभावी उपेक्षित, गरम हवामान त्यामुळे लोकांची हलाखीची आर्थिक परिस्थिती. हे सगळं लक्षात घेता तिकडे सुट्ट्यांमध्ये करायला माणसांचा छंद म्हणजे गप्पागोष्टी, सणवार आणि मनाला विरंगुळा आध्यात्म्याचा त्यामुळं भजन कीर्तन. हॉलिडे होम म्हणजे आत्या, मामा , मावशीचं हक्काचं घर आणि उन्हाळ्यात ४६-४८ डी सें मध्ये एसी कार विना पिकनिक स्पॉट म्हणजे पारिवारिक जेवण (वॉटर कूलर लावून), त्याला पॉटलक पण म्हणता येईल (फरक इतकाच कि सगळं घरच्या बाईनं शिजवायचं सगळ्यांसाठी). ह्या सगळ्यात राहिलेला विषय म्हणजे गप्पागोष्टी! वरील सगळ्या चांगल्या वातावरणामुळे मराठीची जी वैदर्भीय बोली आहे त्याला आलेले एक प्रकारचे तुसडेपण एकप्रकारचा एक्सट्रीमिझम, ह्याची काही उदाहरणे व्हाट्सअप वर मिळतीलच , सगळ्यानी तो म्यॅसेज वाचलाच असेल ज्यात कुलर लावताना एक वडील आपल्या ४ वर्षाच्या पोराला रागावून म्हणतात "कुलर जवळ कश्याला जाऊन राहिला बे, शॉक लागून मारशीन लेका " !!
संपूर्ण जगात कोण बाप आपल्या ४ वर्ष्याच्या पोराला "मारशीन न लेका" असं म्हणेल? ज्याला कोणाला शुद्ध मराठी कळते त्याला हि बोली भाषा ऐकून एकदम अचंभित व्हायला होईल खरं! आणि असे एक नाही हजारो उदाहरणं देता येतील पण मुळात प्रश्न हा आहे कि भाषा जरी मराठी असली तरी आपण ज्या बोली भाषेत ती ऐकतो त्याच बोली भाषेत समजायची गरज आहे. जर कालांतरी त्याच मुलान पुण्यात जाऊन बाबाला जाब विचारला कि "बाबा तू तर मला मी ४ वर्षाचा असताना मारशील म्हटलंस" तर हा महाराष्ट्र आणि तो परिवार संयुक्त होऊ शकेल का?
मला असं वाटत - कि माणसं हि प्रेमळच असतात आपण फक्त ते बोलताना मराठी हि समोरचा ज्या बोलीत बोलतोय त्याच बोलीत ऐकायला हवी कारण बोली भाषा समजावून घेतल्यामुळे मनं जुळतील आणि पु लं पुढे सुद्धा पुस्तकाचं प्रकाशन कोणाकडून करावं ह्याचा क्यायसेस राहणार नाही. पुन्ह्या कोण्या नागपूरकरांन चाहा पाजत "काय बेटी ती कंजुषी तुमच्या पुण्यात" असं म्हटलं तर पुणेरी अपमान नागपुरी शैलीत करत "चूप बे" अस म्हणून आनंदाने चहा चा सुरका मारला तर खऱ्या अर्थानं "संयुक्त महाराष्ट्राचा" एक महाराष्ट्र होईल आणी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला सगळे मिळून म्हणतील "जय महाराष्ट्र" !!
-परिक्षीत 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Painful Echoes..

Interesting Numerology!!