Posts

Showing posts from April, 2017

बोलीभाषा......

"काय बेटी ती कंजुषी तुमच्या पुण्या-मुंबईत घ्या चहा घ्या " असं कोण्या नागपूरकरान कोण्या पुण्या किंव्हा मुंबई च्या आपल्या पाव्हण्याला चहा देताना म्हटलं तर? "मला नागपुरात जायचंय ह्या दिवाळीत तुला यायचं तर ये नाहीतर राहा इतेच नोकरीकरत आयुष्यभर" असं कोण्या नागपूरकर नोकरदार नवऱ्यानं आपल्या मुंबईत वाढलेल्या नोकरदार बायकोला त्या दोघांच्या कर्मभूमी पुण्यात म्हंटलं तर? काय हे सांगायलाच हवा का किती बा चा बा ची होईल ते? एक गोष्ट लक्ष्यात घेण्याजोगी आहे इथे ती म्हणजे वरचे दोन्ही हि प्रसांगत संभाषण करणारे रक्ताचे नातेवाईक आहेत. मग विचार असा येतो कि एकाच वाक्य दुसऱ्याच्या मनाला इतकं खोलवर का लागावं ? मला असा वाटतं, बोली भाषा आणि त्या भाषेचा विचार प्रचार आणि मनावर पडलेला प्रभाव, वापरलेले शब्द, आणि त्या शब्दांचा आपल्या मेंदूला माहिती असलेला अर्थ लावण्याच्या वृत्ती मुळेच घडलेले मनावरचे आघात, त्यामुळे वर सांगितल्या प्रमाणे झालेली बा चा बा ची, आणि एकंदरीतच हाताबाहेर गेलेली स्थिती. भाषा मराठीचं पण बोलीभाषा वैदर्भिय त्या मधले अंतर आणी ती न समजल्या मुळे झालेले गैरसमज, गोंधळ. विदर